• Mon. Jun 15th, 2026

    Deepak Borhade: सासऱ्याने निवासस्थानीच अचानक मृत्यूला कवटाळलं; धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी रात्री उपोषण सोडलं!

    Deepak Borhade: सासऱ्याने निवासस्थानीच अचानक मृत्यूला कवटाळलं; धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी रात्री उपोषण सोडलं!

    Jalna News: दीपक बोऱ्हाडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण करत असताना त्यांच्याच घरात सासऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सासऱ्याने निवासस्थानीच अचानक मृत्यूला कवटाळलं; धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी रात्री उपोषण सोडलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना: धनगर आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर लढा उभारणारे धनगर समाजाचे आंदोलक व उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपक बोऱ्हाडे हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपोषणाला बसलेले असतानाच, जालना येथील बोऱ्हाडे यांच्या राहत्या घरी त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर रात्री सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्याने दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर आरक्षणासाठी सुरू असलेले आपले उपोषण स्थगित केले.

    मिळालेल्या माहितीनुसार, 78 वर्षीय रामराव होळकर यांनी बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एकीकडे दीपक बोऱ्हाडे समाजाच्या हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत असताना दुसरीकडे त्यांच्याच घरात सासऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

    नेमकं काय घडलं?

    रामराव होळकर हे दुपारच्या सुमारास टीव्ही पाहत बसले होते. तेव्हा अचानक रामराव यांनी मुख्य रूमचा दरवाजा आतून लॉक करत गळफास घेऊन जीवन संपवलं. ते दरवाजा उघडत नसल्याने घरातील इतर सदस्यांनी आरडाओरड केला. मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. यावेळी पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी रामराव होळकर हे लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.

    रामराव होळकर यांना रुग्णालयात नेले असता जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्यू घोषित केले आहे. याप्रकरणी कदिम पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा