• Tue. Jun 9th, 2026

    Ashok Kharat Case: अशोक खरातचे व्हिडिओ मित्रांना पाठवत असाल तर सावधान! व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

    Ashok Kharat Case: अशोक खरातचे व्हिडिओ मित्रांना पाठवत असाल तर सावधान! व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

    Crime News: जर कोणीही असे व्हिडिओ सोशल मीडिया, न्यूज पोर्टल किंवा इन्स्टाग्रामवर प्रसारित केले, तर संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

    अशोक खरातचे व्हिडिओ मित्रांना पाठवत असाल तर सावधान! व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याने तिघांवर गुन्हा दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, अहिल्यानगर: भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कठोर पाऊल उचललं आहे. कोपरगाव शहरात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करत एकाचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन्स आणि युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. मात्र, या गुन्ह्यातील पीडित महिलांची ओळख पटेल असे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. २५ मार्च २०२६ रोजी कोपरगावमधील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे (रा. कोपरगाव) याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केले होते. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून राहुल शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) याने पाठवल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे, योगेशला हे व्हिडिओ त्याचा माजलगाव (जि. बीड) येथील मित्र संदीप गर्जे याने पाठवले होते.

    याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल शिंदे, योगेश आढाव आणि संदीप गर्जे या तिघांविरुद्ध बी.एन.एस. कलम २९४ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना बेड्या ठोकल्या असून, तिसरा आरोपी संदीप गर्जे याचा शोध सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात अनेक महिला पीडित असण्याची शक्यता आहे. पीडितेची किंवा तिच्या कुटुंबाची ओळख पटेल असे व्हिडिओ कोणाकडेही असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत, असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा