राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाहीत. पण या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होणं म्हणजे हा ‘प्री प्लान’चा भाग असल्याचा दावा मिटकरींनी केलाय. तसेच झिरवळांचा अशाप्रकारे व्हिडीओ व्हायरल करणे म्हणजे ‘सोची-समजी साजिश’ असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “या प्रकरणात अनेक लोकांचे फोटो त्या ट्रान्सजेंडरसोबत आहेत. कॅप्टन अशोक खरात प्रकरण तापले असताना राज्यातील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आठ महिन्यांपूर्वीचा झिरवळ यांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल करण्यात आला. हा पूर्ण प्रकार कोणीतरी प्री प्लान करूनच केला आहे”, असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय नरहरी झिरवळ प्रकरण हे लक्ष विचलित करण्यासाठीच उकरून काढण्यात आले असल्याचा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला.
“दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर नरहरी झिरवळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच त्यांच्या मागे अँटी करप्शन लावण्यात आले आणि त्यानंतर हा व्हिडिओ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे ही सोची-समजी साजिश आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा खळबळजनक दावा अमोल मिटकरी यांनी केला.
अशोक खरात प्रकरणावर मिटकरी काय म्हणाले?
“कॅप्टन खरातच्या आश्रमात अघोरी पूजा करणाऱ्यांनी हा इशारा समजून घ्यावा,” असेही मिटकरी यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांचा खरात यांच्यासोबत एकही फोटो नसल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांना आहे. आपण पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड किंवा कोअर कमिटीमध्ये नसल्याने या विषयाची अधिक माहिती नसल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.
मात्र नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओवरून सुरू झालेल्या या वादामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा