• Thu. Jun 18th, 2026
    Pune News: जेवणानंतर पाणी प्यायला गेला अन् नळालाच चिकटला; पुण्याच्या कृषी विद्यालयात 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    Pune Student Electric Shock Death: पुण्यातील कृषी महाविद्यालयात २३ वर्षीय विद्यार्थी चैतन्य चव्हाण याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    पुणे कृषी विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मधील जलशुद्धीकरण यंत्रातून (आरओ) विजेचा तीव्र धक्का बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुरक्षा विषयक उपाययोजनांकडे काणाडोळा आणि गंभीर हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

    चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी महाविद्यालयात ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

    Maharashtra TimesPune Traffic Update: पुणेकरांसाठी महत्त्वाचे! राम नवमीनिमित्ताने आज वाहतुकीत मोठे बदल, दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
    चैतन्य १४ मार्चला मेसमधील कामकाज पाहत होता. जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करताना अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

    सुरक्षा उपाययोजनांचा अभाव
    मेसमधील उपकरणांची योग्य देखभाल न करणे, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरातील विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) तातडीने करावे, तसेच जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

    Maharashtra TimesPune News : पुण्यात तरुणाने तरुणीला प्रेमाच्या नावाने फसवलं; प्रेम, लग्नाचं आमिष अन् नोकरी लागताच पलटला
    ही अतिशय दुखःद घटना आहे. चैतन्य चव्हाण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो बरा व्हावा याकरिता महाविद्यालय, विद्यार्थी अशा सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यात यश आले नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा केली. या घटनेबाबत अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ती पाहणी करून सोयीसुविधा अद्ययावत करण्याबाबत अहवाल देईल. – डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा