• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime: लग्नाचं आमिष आणि फोटो व्हायरलची धमकी; चंदननगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमांना बेड्या

    पुण्यातील चंदननगर परिसरात अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने फसवून अत्याचार केल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी शहराला हादरवून सोडलं आहे. अल्पवयीन मुलींना प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारांमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. एका घटनेत बालाजी गुरुनाथ स्वामी (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने अल्पवयीन मुलगी असल्याचं माहिती असूनही तिला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं. तिचा विश्वास जिंकत त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने जाब विचारला असता, आरोपी थेट त्यांच्या घरात घुसला आणि आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.

    दुसरी घटना

    तर दुसऱ्या घटनेत ऋतिक रावसाहेब लोणके (वय २७, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यानेही असाच प्रकार केल्याचं उघड झालं. त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नाही, तर तिच्यासोबत बोलून दिले नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केला.

    पोक्सो गुन्हा दाखल

    या दोन्ही घटनांमध्ये पीडित कुटुंबांनी पुढे येत तक्रार केल्यानंतर हे प्रकार उघड झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वाघोली आणि हडपसर भागातही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना समोर आल्याने शहरात अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesSunil Tatkare : ‘कृपा करा आणि थांबा, नाहीतर माझ्याकडे तुमच्या कट कारस्थानांची इत्यंभूत माहिती’, सुनील तटकरेंचा रोहित पवारांना इशारा

    फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

    या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित होत आहे. मात्र वाढत्या अल्पवयीन मुलींच्या फसवणूकीचा प्रश्न देखील तिथकाच गंभीर होत आहे. सोशल मीडिया वरील मैत्री आणि तेथून होणारी फसवणूक एकीकडे वाढली असताना आता लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसवण्याच्या घटनामध्ये देखील वाढ होत आहे.

    अशा घटनानंतर शहरातील मुली स्वतःला असुरक्षित मानत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा आरोपीवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा घटना कमी व्हयला पाहिजेत अशी मागणी देखील नागरिक करताना पाहायला मिळत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा