Palm Beach Road Hit And Run: प्रशांतचे वडील रिक्षाचालक असून, प्रशांत नुकताच एका ट्रेडिंग कंपनीत कामाला लागला होता. घरातील कर्ता मुलगा गमावल्याने जमदाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोपरखैरणे येथे राहणारा प्रशांत विजय जमदाडे (२३) आणि हरमन कौर (१७) हे दोघे ३ मार्च रोजी ३ पहाटे वाजण्याच्या सुमारास पामबीचवरून कोपरखैरणे येथे जात असताना सारसोळे जंक्शन आणि मोराज सर्कलदरम्यान त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदात मागून येणाऱ्या ‘स्कोडा’ आणि ‘मारुती ब्रेझा’ या दोन कारनी त्यांना चिरडले होते. या भीषण अपघातात प्रशांतचे शीर धडावेगळे झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
Pune Mumbai E-Way Accident : रात्रभर सिनेमे पाहिले, पहाटे लोणावळ्याला सूर्योदय पाहायला गेलो; तिघा तरुणांचा अपघाती अंत, मित्रांनी सांगितला घटनाक्रम
अपघातानंतर मदतीसाठी थांबण्याऐवजी दोन्ही कारचालकांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. सानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन्ही गाड्यांचा शोध लावून आरोपी चालक सागर सांडा (२३, रा. घणसोली) आणि कृष्णा रावरिया (२०, रा. घणसोली) यांची ओळख पटवली आहे.
या अपघातात हरमनच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती. ती अतिदक्षता विभागात दाखल होती. मात्र, उपचारादरम्यान ती शुद्धीवर आलीच नाही. त्यामुळे पोलिस तिचा जबाबही नोंदवू शकले नाहीत. तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. कोपरखैरणे येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अपघातानंतर आरोपींनी साधी माणुसकीही दाखवली नाही. त्यांनी माझ्या मुलीला रस्त्यावर सोडून पळ काढला. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’, अशी मागणी हरमनच्या आईने केली.
Ashok Kharat सोबतच्या फोटोंवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘फोटो प्रसिद्ध करणं ही अतिशय चुकीची बाब’
आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती सानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल मुंडे यांनी दिली.
