Ashok Kharat Case: काही नागरिकांना धाक दाखवणे, गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मूळचा कहांडळवाडी येथील रहिवासी असलेल्या खरात याने मिरगाव येथे जाम नदीच्या काठावर ईशान्येश्वर मंदिर उभारले होते. मंदिराच्या आडूनच त्याने गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे मिरगावचे नाव बदनाम झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभा घेऊन कॅप्टन खरातचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला गावातून बहिष्कृत करण्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ashok Kharat : भोंदूबाबा खरातविरुद्ध आणखी तीन महिला पुढे आल्या, लॅपटॉप, CCTV ते CDR; SIT कडून सखोल चौकशी सुरू
योजनांवर डल्ला?
येथील हिंगे वस्तीसाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी ईशान्येश्वर मंदिराजवळ उभारल्याने त्या भागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला.
दबाव टाकून जमिनींची खरेदी
गावात कोणीही जमीन विक्रीस काढली, तर कॅप्टन खरात ती वाढीव दराने स्वतःच खरेदी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिकांना हक्क असूनही जमिनी घेता येत नसल्याचे सांगण्यात आले.
Ashok Kharat : लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण; तरुणीच्या पोटावर उपकरण फिरवल्याचाही व्हिडिओ
३९ लाख लिटर पाण्याचे आरक्षण
‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरात याच्यासाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्या वेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते.
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित शिवानिका संस्थानला दारणा प्रकल्पातून पाणी देण्याच्या आदेशाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी राखून ठेवलेले पाण्याचे आरक्षण तातडीने रद्द करण्याचा आदेशही दिला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे खरात किती उच्चपदस्थांच्या संपर्कात होता हेही आता उघड झाल्याचे विखे यांनी म्हटले आहे.
