Mumbai Local Passenger Death : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोरीन्हा व्हॅलेंटाईन डिसूझा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तब्बल १२ वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला
‘मृत व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला याचा कोणताही पुरावा नसताना आणि तो रेल्वे रुळ ओलांडत होता असे दाखवणारा कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना, सामाजिक कल्याणाच्या कायद्याचा विचार आवश्यक आहे. त्या प्रवाशाची परिस्थिती लक्षात घेता, अपघाताची ती घटना अनपेक्षित अपघाताची नव्हती किंवा तो अनधिकृतरित्या प्रवेश करणारा (घुसखोर) होता, हा दावा नाकारावा लागेल’, असे आदेशात नमूद करून न्यायमूर्तींनी पीडित कुटुंबाला दिलासा दिला.
Pune Crime : पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधाला विरोधातून नात्यातील तरुणाने संपवलं, 22 वर्षीय आरोपी अटकेत
काय म्हणाले हायकोर्ट?
त्यानुसार, ‘पीडित कुटुंबाला अपघाताच्या तारखेपासून प्रत्यक्षात भरपाईची रक्कम मिळण्याच्या तारखेपर्यंत वार्षिक सहा टक्के व्याजासह चार लाख रुपयांच्या भरपाईसाठी अर्ज देता येईल. मात्र, एकूण भरपाईच्या रकमेवर आठ लाख रुपयांची कमाल मर्यादा असेल. यानुसार, अर्जदारांनी आपल्या बँकेचा तपशीलही रेल्वेकडे द्यावा. रेल्वेने अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून १२ आठवड्यांच्या आत भरपाईची रक्कम अदा करावी’, असे न्यायमूर्तींनी आदेशात स्पष्ट केले. तसेच पीडित कुटुंबाचा भरपाईचा अर्ज फेटाळणारा रेल्वे अपघात न्यायाधिकरणाचा २८ फेब्रुवारी २०१४ रोजीचा आदेश रद्द केला.
Pune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यात
नेमकं काय झालं होतं?
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे कोरीन्हा व्हॅलेंटाईन डिसूझा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तब्बल १२ वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. कोरीन्हा यांचे पती व्हॅलेंटाईन हे दादरमधील रोलेक्स घड्याळाच्या शोरूममध्ये कामाला होते. ते नायगावला पत्नी, लहान मुलगा व आई-वडिलांसोबत राहत होते. १८ मार्च २०११ रोजी त्यांचा लोकलच्या अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी न्यायाधिकरणात भरपाईसाठी दावा केला होता.
Unseasonal Rain in Maharashtra | राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपीटीचा तडाखा; शेतकरी हवालदील
व्हॅलेंटाईन अधिकृत प्रवासी होते आणि अर्जदारांशी त्यांचे नाते होते, हे सिद्ध झाले. मात्र, दावा मान्य होण्यासाठी त्यांचा मृत्यू अनपेक्षित घटनेत झालेला नसून रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे, असा निष्कर्ष न्यायाधिकरणाने नोंदवला होता. त्याविरोधात डिसूझा कुटुंबीयांनी अॅड. अवधूत बिडये यांच्यामार्फत अपिल केले होते.
