पुण्यात सध्या पथारी व्यावसायिकांवर दुहेरी संकट ओढवलं आहे. आधीच गॅस टंचाईमुळे पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच महानगरपालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू झाली आहे. आता आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न व्यावसायिक प्रशासनाला विचारत आहेत. तर अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली.