• Wed. Mar 11th, 2026

    डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 1, 2026
    डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान – महासंवाद

    मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

    राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उद्घाटन झाले.

    डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून लोकभवन  येथे स्वच्छता व वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धनाचे कार्य केले जात असल्याबद्दल राममूर्ती यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे कौतुक केले तसेच भविष्यात देखील स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन केले. जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

    आजच्या स्वच्छता अभियानात जवळपास 200 श्री सदस्यांनी भाग घेतला.

    0000

     जनसंपर्क अधिकारी/लोकभवन

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed