• Sat. Mar 7th, 2026
    Pune Crime: भिगवण प्रकरणात चर्चेत असलेल्या अझर शेखचा ‘गेम ओव्हर’; पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना केली अटक

    Pune Crime News: भिगवण प्रकरणातील आरोपींचा चुलता माजी सरपंच अझर शेख याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तलाठ्याला मारहाण केल्याप्रकरणी तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.

    माजी सरपंच अझर शेख आणि युवराज मेंगवाडे यांना दौंड पोलिसांकडून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्य़ा स्थानिक गुन्हे शाखेने आज (27 फेब्रुवारी) रोजी अझर शेखला अटक केली आहे. दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्ह्या दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. तो अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच आहे. याशिवाय गेला आठवडाभर भिगवण प्रकरण जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं, त्यामधील आरोपी तरुण जहीर आणि आयान शेख यांचा तो नात्याने चुलता आहे. दरम्यान, अझर शेख हा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता. यालाच अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेखच्या अटकेची मागणी केली जात होती.

    तलाठ्याला मारहाण

    दरम्यान, अझर शेखवर तलाठ्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप होता. या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. अवैध वाळू उपसा प्रकरणी अझरने स्वामी चिंचोली या गावातल्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केली होती. याप्रकरणात त्याला मदत करणाऱ्या युवराज मेंगवाडे नामक तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे.

    स्टेटसमुळे आरोप

    भिगवणमधील तरुणीचं कथित अपहरण प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा त्या प्रकरणातील तरुण – तरुणी हे बारामती पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले होते. त्याआधी काही तासांपूर्वी अझर शेखने सोशल मीडियावरुन एक स्टेटस शेअर केलं होतं. ज्यामध्ये त्याने सदैव एकनिष्ठ असं लिहिलेलं होतं. त्यामुळे भिगवण प्रकरणामध्ये अझरचाच हात असल्याची चर्चाही सुरु झाली होती. अझरवर दौंड परिसरातील विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला आता स्थानिक पोलिसांनी अटक करुन ताब्यामध्ये घेतलं आहे.

    Maharashtra TimesBombay High Court Aurangabad Bench: परस्पर संमतीने संबंध ‘अत्याचार’ ठरत नाहीत; उच्च न्यायालयाने ‘पोक्सो’ गुन्हा रद्द केला

    दरम्यान, आता त्याला दौंड न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

    मुलीने फिरवला जवाब

    दरम्यान, जेव्हा भिगवण प्रकरण सुरु झालं तेव्हा मुलीने आईबरोबर जाण्यास नकार दिला होता. तिने मी स्वतःच्या मर्जीने मुलाबरोबर आली असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर जेव्हा इंदापूर कोर्टामध्ये सुनावणाी पार पडली त्यावेळी मात्र संबंधित तरुणीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केली होती.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा