१० हजार रुपयांच्या कर्जासाठी २ लाख रुपये व्याज देऊनही सावकाराचा छळ थांबला नाही. अखेर २६ वर्षीय योगेशने सावकाराच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.
दोन लाख रुपये केले वसूल
मयत योगेश हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अत्यंत गरिबीतील परिस्थितीत असलेल्या योगेशने पिंटू नामक व्यक्तीकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. या तुटपुंज्या रकमेच्या बदल्यात सावकाराने आतापर्यंत योगेशकडून दोन लाख रुपये व्याजापोटी वसूल केले होते. तरीही सावकाराची पैशाची भूक शमली नव्हती. तो वारंवार योगेशकडे अधिक पैशांचा तगादा लावत होता.
सुसाइड नोटमध्ये काय?
योगेशने मृत्यूपूर्वी संपूर्ण हकीकत सुसाइड नोटमध्ये लिहिली आहे. सापडलेल्या चिठ्ठीत त्याने सावकार पिंटू यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तसेच केवळ पैशांचा तगादाच नव्हे, तर पिंटूने योगेशला मारहाण केली होती आणि त्याच्या वृद्ध आई-वडिलांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.
Pune Crime: ‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस’ म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे योगेशने चिठ्ठीत नमूद केले आहे. “पिंटूला कडक शिक्षा व्हावी,” असेही चिठ्ठीत लिहिले आहे.
Avinash Warjurkar : माजी आमदाराचा काँग्रेसला रामराम, मुंबईत फडणवीसांची भेट, भाजपचा झेंडा हाती धरणार
कठोर कारवाईची मागणी
योगेशच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. हे संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. अत्यंत कष्टाळू मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून दोषी सावकारावर कठोर कारवाईची मागणी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून होत आहे.
