Navi Mumbai Woman Ends Life: सासरच्या छळाला कंटाळून नवी मुंबईत 38 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काय घडलं नेमकं?
काय घडलं?
पुष्पा यांचा विवाह २०१४मध्ये सतीश शिरोळे यांच्याशी झाला होता. सतीश यांचे जून, २०२३मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर पुष्पा या दोन लहान मुलांसह कामोठे येथे राहत होत्या. पतीच्या निधनानंतर मिळणारे लाभ, विम्याचे पैसे आणि कामोठे येथील हक्कावरून घराच्या मालकी सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. सासू कोंडाबाई, नणंद प्रतिभा, दीर संदीप आणि विनायक हे वारंवार पैशांची मागणी करीत होते. या त्रासाबाबत त्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये कामोठे पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
Nagpur Crime : प्रियकराशी ब्रेकअप, तरुणीची इंस्टावर दुसऱ्या तरुणाशी मैत्री, संतापात एक्स बॉयफ्रेंडकडून दुचाकींची तोडफोड
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी पुष्पा यांनी आपल्या लहान मुलीला, ‘मी आता कधीच घरी येणार नाही’, असे सांगून घर सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कुलाबा परिसरातील समुद्रात सापडला.
Pune Accident: पुण्यात भीषण दुर्घटना! सळई डोक्यावर पडून कामगार महिलेचा मृत्यू; क्रेनचा पट्टा तुटल्याने अनर्थ
तर दुसरीकडे, बारावीचे दोन पेपर कठीण गेल्याने तणावाखाली येऊन एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात घडली. आई, वडील आणि भावासोबत राहणारी ही मुलगी बारावीच्या वर्गात शिकत होती. तिचे आतापर्यंत चार पेपर झाले होते, मात्र यातील दोन पेपर कठीण गेल्याने ती तणावात होती. बुधवारी सकाळी घरात कोणीही नसताना तिने गळफास घेतला. त्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. अभ्यासाच्या तणावातून मी आत्महत्या करत असून आई-वडिलांनी यासाठी स्वतःला जबाबदार धरून त्रास करून घेऊ नये, असे त्यात म्हटले होते.
