• Wed. Jul 1st, 2026

    इराणमधील भारतीय नागरिकांना इराण सोडण्याचे तेहरानमधील भारतीय दूतावासाचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 24, 2026
    इराणमधील भारतीय नागरिकांना इराण सोडण्याचे तेहरानमधील भारतीय दूतावासाचे आवाहन – महासंवाद

    मुंबई,दि. २४ : भारत सरकारने ५ जानेवारी २०२६ रोजी जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता, सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना (विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटक) उपलब्ध वाहतुकीच्या साधनांनी, ज्यामध्ये व्यावसायिक विमान सेवांचा समावेश आहे, त्याद्वारे इराण सोडण्याचा सल्ला तेहरानमधील भारतीय दूतावासामार्फत देण्यात आला आहे.

    १४ जानेवारी २०२६ रोजीच्या सूचनेनुसार सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींनी (PIOs) योग्य खबरदारी बाळगावी, आंदोलने किंवा निदर्शने होणाऱ्या भागांत जाणे टाळावे, इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि स्थानिक घडामोडींसाठी स्थानिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवावे.

    इराणमधील सर्व भारतीय नागरिकांनी पासपोर्ट आणि ओळखपत्रांसह आपली प्रवास आणि इमिग्रेशन कागदपत्रे स्वतःकडे तयार ठेवावीत. यासंदर्भात कोणत्याही मदतीसाठी त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    इराणमध्ये असलेल्या ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप भारतीय दूतावासाच्या लिंकवर (https://www.meaers.com/request/home ) नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करुन घ्यावी. ही लिंक दूतावासाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. इराणमधील इंटरनेट व्यत्ययामुळे एखादा भारतीय नागरिक नोंदणी करु शकत नसेल तर त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी ही नोंदणी करावी असे आवाहन तेहरानमधील भारतीय दुतावासामार्फत करण्यात आले आहे.

    भारतीय दूतावासाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि ईमेल:-

    मोबाईल क्रमांक: +९८९१२८१०९११५; +९८९१२८१०९१०९; +९८९१२८१०९१०२; +९८९९३२१७९३५९.

    ईमेल : [email protected]

    ००००

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed