• Wed. Jul 1st, 2026

    ‘पुणे मेट्रो २’चा चांदणी चौकापर्यंत विस्तार, वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपुलाची शक्यता; कुठून-कसा असेल मार्ग?

    ‘पुणे मेट्रो २’चा चांदणी चौकापर्यंत विस्तार, वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपुलाची शक्यता; कुठून-कसा असेल मार्ग?

    Pune Metro Flyover: पुणे मेट्रो 2अ सुरु झाल्यानंतर वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपूल बांधण्याची शक्यता आहे. वनाझ ते चांदणी चौकापर्यंत मेट्रो मार्गिका 2अ उभारण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोच्या वनाझ ते चांदणी चौक दरम्यानच्या विस्तारित मार्गिकेदरम्यान वाहनांसाठीच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कचरा डेपोपासूनच प्रस्तावित दुहेरी उड्डाणपुलाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

    तीन ते चार दिवसांत आराखडा सादर करणार

    केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो), पुणे महापालिका आणि कोथरूडमधील स्थानिक नागरिक यांच्या बैठकीत सविस्तर चर्चेनंतर उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसांत याबाबतचा सुधारित आराखडा सादर करण्याच्या सूचना मंत्री मोहोळ यांनी महामेट्रोला दिल्या.

    Maharashtra TimesPune Ring Road: ‘रिंग रोड’मुळे पुण्यातील बांधकामे बाधित होणार, PMRDAची कबुली; मार्गाच्या नकाशात मोठा गोंधळ

    वनाझ ते चांदणी चौक मेट्रोच्या आराखड्याबाबत कोथरूड सिटीझन फोरमने अनेक आक्षेप नोंदविले होते. याच मार्गावर कोथरूड डेपोच्या चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासह इतरही काही सूचना त्यांनी केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून महामेट्रोसह महापालिका प्रशासनासोबत सातत्याने त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर बुधवारी मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर दोनशे ते अडीचशे मीटरने उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. वाढीव खर्चाचा बोजा पालिकेतर्फे उचलण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

    यापूर्वी महापालिकेने एकमजली उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली होती. पण मेट्रोच्या विस्तारामुळे महामेट्रोने नल स्टॉपप्रमाणेच डबल डेकर उड्डाणपुलाचा प्रस्ताव मांडला आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात रामवाडी ते वनाझ मेट्रोचा चांदणी चौकपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या मार्गावर दोन स्थानक असतील आणि ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असेल. या संपूर्ण विस्तारासाठी ३,६२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक स्थानकांचा समावेश असेल.

    Maharashtra TimesMumbai-Pune Connecting Link: दोन महिन्यातचं ‘कनेक्टिंग लिंक’वर थरारक घटना, बोगद्यात दोन-तीन दगड पडले; चालत्या गाडीवर आदळले

    कर्वे रस्त्यावर मोठा दुहेरी उड्डाणपूल?

    पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो करताना, खासगी वाहनांना प्रोत्साहन देणारे उड्डाणपूल त्याच वेळी हवे आहेत. त्यामुळे एसएनडीटी ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरही हुतात्मा राजगुरू चौकापासून (करिष्मा सोसायटी) ते वनदेवी मंदिरापर्यंत उड्डाणपूल करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. मेट्रोचे काम झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक सुधारणेच्या दृष्टीने कोणते काम करणे शक्य नसल्याने आत्ताच लांबलचक उड्डाणपूल उभारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आग्रही असल्याचे समजते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा