• Wed. Jul 1st, 2026

    राज्यात गुंतवणुकीसाठी इव्हॉल्व कंपनीचा राज्य शासनाशी सामंजस्य करार

    ByMH LIVE NEWS

    Feb 24, 2026
    राज्यात गुंतवणुकीसाठी इव्हॉल्व कंपनीचा राज्य शासनाशी सामंजस्य करार

    मुंबई

    ऑस्ट्रेलियाची इव्हॉल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवी मुंबई, पुणे, आणि नागपूर परिसरात कंपनी जवळपास 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणुकीतून जवळपास 1 हजार 75 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी कंपनीने राज्य शासनसोबत करार केल्याची माहिती उद्योग विभागामार्फत देण्यात आली. या करारांचे आदान प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उद्योग विभाग व कंपनीमध्ये करण्यात आले.

    यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, इव्हॉल्व कंपनीचे कंट्री हेड आदित्य शर्मा, इव्हॉल्व कंपनीच्या भारतीय सहभागीदार असलेल्या एम्प्रेसेंड उद्योग समूहाचे अध्यक्ष रुस्तम केरावाला, वरूण गुप्ता, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed