मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोप कृष्णा आंधळे हा तीन वेळा गावी येऊन गेल्याचा मोठा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांनी सीआयडीला देखील याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड : मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळे याच्याबद्दल मोठा दावा केला आहे. कृष्णा आंधळे हा तीनवेळा गावी येवून गेला. त्याच्यापासून आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचा मोठा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. कृष्णा आंधळे याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
“आम्हाला जी माहिती मिळाली ती मी सीआयडी ऑफिसला कळवली. तीन वेळेस कृष्णा आंधळे हा आरोपी गावाकडे येऊन गेला आणि ही माहिती खरी होती. त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे येऊन गेला. मात्र याप्रकरणी जो तपास आणि शोधा शोध सुरू आहे, त्यामध्ये या आरोपीकडे कुठलाही मोबाईल नाही. त्यामुळे तपास यंत्रणेला त्याला शोधण्यास अडचण येऊ शकते. मात्र यावर काय करायचं आणि कशा पद्धतीत त्या आरोपीला जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करू. कारण या आरोपीपासून आमच्या सर्व कुटुंबाला जीवितास धोका आहे. हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सर्व लोक आहेत. लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुस्क्या आवळून पोलीस प्रशासनाने त्याची धिंड काढावी. त्याला जेरबंद करावे अशी आमची मागणी आहे”, असं धनंजय देशमुख म्हणाले.
धनंजय देशमुख आरोपीच्या संपत्ती जप्तीबाबत काय म्हणाले?
“येत्या सहा तारखेला होणाऱ्या सुनावणीत आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यास कुठे कमी पडणार नाही. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांनी याचा पाठपुरावा करून जे सीज केलेले अकाउंट आहे ते लवकरच जप्त करण्यात यावेत यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल”, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
“मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला दिला होता, त्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे. काही फाईल अपलोड होत नव्हे. त्यामध्ये त्या फाईल ओपन करून द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. यावरच आज कोर्टात चर्चा करण्यात आली. आज ती माहिती सगळी कम्पलेट करण्यात आली. पुढील सुनावणीत सर्व साक्षीदारांची लिस्ट देण्यात येणार आहे. लवकरच साक्षी पुराव्याची यादी दिली जाणार आहे. लवकरात लवकर ही केस मार्गी लागावी अशी माझी मागणी आहे”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा