• Sat. Mar 7th, 2026

    Jalna Crime: जालन्यात बसस्थानक परिसरातल्या लॉजवर छापा; मालकांचा काळा धंदा उघड, पश्चिम बंगाल ते संभाजीनगर रॅकेट उद्ध्वस्त, 13 महिला…

    Jalna Crime: जालन्यात बसस्थानक परिसरातल्या लॉजवर छापा; मालकांचा काळा धंदा उघड, पश्चिम बंगाल ते संभाजीनगर रॅकेट उद्ध्वस्त, 13 महिला…

    बसस्थानक परिसरातील मोक्ष आणि वैष्णवी लॉजवर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून…

    जालन्यात मोक्ष आणि वैष्णवी लॉजवर छापेमारी, परराज्यातील महिलांचा समावेश.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना: जालना बसस्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोन लॉजिंगवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत १३ महिला पीडितांची सुटका करून ७ पुरुष आरोपींना ताब्यात घेतले आहे. जालना बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉज आणि वैष्णवी लॉजचे मालक हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करून घेत असल्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोक्ष लॉजवर छापा मारला.

    नेमकं काय घडलं?

    लॉजचे मालक सचिन नंदू पवार (वय ३०, रा. वाटूर, ता. परतूर, जिल्हा- जालना), मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव (रा. खरपुडी, ता. जि. जालना) यांच्यामार्फत वैष्णवी लॉजचे मॅनेजर कैलास रतन कुमार (वय ३०, रा. सावा, ता. जि. चित्तोडगड, राज्य राजस्थान, ह.मु. वैष्णवी लॉज, जालना) हे स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरून महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवत असताना छापा मारण्यात आला. यामध्ये पंकज भाऊसाहेब निकाळजे (वय २५ वर्ष, रा. जांमवाडी, ता. जि. जालना), तुषार हरिश बत्रा (वय २४ वर्ष, रा. परतूर), रोहित संजय बोर्डे (वय २६ वर्ष, रा. जांमवाडी, ता. जि. जालना), करण रवी वाहुळे (वय २० वर्ष, रा. जामवाडी, ता. जि. जालना) यांच्यासह पश्चिम बंगाल राज्यातील ६, आसाम राज्यातील ३ व छ. संभाजीनगर येथील ४ अशा एकूण १३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात ८१ हजार ७५० रुपये एवढा मुद्देमाल, रोख रक्कम व साहित्य मिळून आले आहे.Maharashtra TimesNashik Crime: अंगावर काळे कपडे, पिझ्झा अन्…; निर्जन रानात 25 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं? महामार्गालगत बॉडी आढळली

    पुरुष आरोपींसह १३ महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    यांनी कारवाई केली

    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश शिंदे, पोउपनि रवी जोशी, पोउपनि संजय गवळी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक घुगे, आक्रूर धांडगे, शुभम राठोड, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, चित्रा चव्हाण व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा