पुण्यातील मावळ तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील राजकीय संघर्ष तीव्र होत चाललाय.राज्यात एकत्र असताना मावळमध्ये दोन्ही पक्ष एकत्र राहण्यास इच्छुक नसल्याचे वारंवार समोर येतंय.राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर भ्रष्टाचार व ईव्हीएम हॅकचा आरोप केलाय.भाजपचे स्थानिक नेते बाळा भेगडे, गणेश भेगडेंनी शेळकेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला.यानंतर पुन्हा एकदा शेळकेंनी भेगडेंना न्यायालयात दावा करण्याचे आव्हान दिले आहे.आरोप खोटे निघाल्यास पाय धरून माफी मागेन असा पलटवार शेळकेंनी भाजपवर केला.