• Thu. Jun 18th, 2026

    काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक — मंत्री नितेश राणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 18, 2026
    काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक — मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देत स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती.

    बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

    बैठकीस महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग (केसीओ) असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मितीला वेग येईल, निर्यातवाढीस प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक आर्थिक विकासाला भक्कम आधार मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

    ०००

    किरण वाघ/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed