• Mon. Mar 9th, 2026
    Pune Crime: पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलेला 6 जणांनी संपवलं, नंतर दगडाच्या खाणीत…; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

    Pune Murder Case: महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने हत्या असल्याचं स्पष्ट झालं व त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी तपास सुरू केला.

    पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलेलं 6 जणांनी संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच भारतीय विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना उघड झाली आहे. देहविक्रय करणाऱ्या एका महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या वादातून तिला दगडाच्या खाणीत ढकलून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी महिलेला पुण्यातील खडी मशीन चौक परिसरात नेले. तेथे तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर काही कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी तिला काठीने गंभीर मारहाण केली आणि नंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत ढकलल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात कोंढवा येथील जुन्या खाणीत सदर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शवविच्छेदन अहवालात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे हा खून असल्याचे स्पष्ट झालं आणि त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

    “मृत महिला आणि मुख्य आरोपी एकमेकांना ओळखत होते व त्यांच्यात काही काळापासून संपर्क होता. दोघेही दारूचे व्यसनी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व पुणे गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली.

    दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये म्हणून आरोपींनी वापरलेल्या रिक्षाचा काही भाग बदलल्याचं तपासात आढळून आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा