• Tue. Mar 10th, 2026

    Mumbai Local Train : तरुण सीएसएमटी स्टेशनच्या ट्रॅकवर डोकं ठेवून झोपला, समोरुन लोकल आली अन्…. भयंकर प्रकाराने प्रवाशांमध्ये खळबळ

    Mumbai Local Train : तरुण सीएसएमटी स्टेशनच्या ट्रॅकवर डोकं ठेवून झोपला, समोरुन लोकल आली अन्…. भयंकर प्रकाराने प्रवाशांमध्ये खळबळ

    मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनवर एका मद्यधुंद तरुणाने थेट रेल्वे रुळावर झोप घेऊन मृत्यूला आमंत्रण दिले होते. समोरून येणाऱ्या लोकलला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोटरमनने वेळीच ब्रेक लावला आणि अनर्थ टळला. या घटनेमुळे मध्य रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वेस्टेशनवर धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली. एका तरुणाने चक्क स्टेशनच्या ट्रॅकवर झोप घेतली. हे दृश्य पाहताच या स्टेशनवरील प्रवाशांची त्रेधा तिरपीट झाली. तरुण रुळांवर झोपला आणि तितक्यात स्टेशनवर लोकलची एन्ट्री झाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही सजग प्रवाशांनी मोटरमनला याबाबतची माहिती आवाज देऊन कळवल्याने समोरील प्रसंग टळला आहे. मोटरमनने सदरील प्रकार समजताच गाडीला ब्रेक लावला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

    नेमकं काय घडलं?

    सीएसएमटी हे स्टेश नेहमीच गर्दीने व्यावरलेले असते. स्टेशनच्या रुळांवर लोकल गाडी येताना काही मिनिटे वाचावरण तणावाचे बनले होते. काही सजग मुंबईकरांनी ही घटना पोलिसांनाही कळवली. त्यानंतर तात्काळ रेल्वे पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. परिस्थिती पाहून त्यांनी संबंधित तरुणाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं, त्यानंतर पुढे होऊ शकत असलेला प्रकार टळला आहे.

    सीएसएमटी स्टेशनवर लक्ष

    दरम्यान, या गंभीर प्रकारानंतर पोलिसांकडून सीएसएमटी स्टेशनच्या सर्व फलाटांवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं होतं. रेल्वे पोलिसांनी सदरील तरुणाची चौकशी सुरु केली आहे. तो हा प्रकार का करत होता, रुळांवर तो कसा पोहोचला याचीही माहिती मिळवण्याचा तपास पोलिस करत आहेत.

    Maharashtra TimesSatara Crime: ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाचं नववीतल्या मुलीसोबत भयानक कृत्य; शाळेतच विद्यार्थिनी….

    तरुणावर गुन्हा दाखल

    हा तरुण दारुच्या नशेत होता, तसेच हा तरुण स्टेशनवर भीक मागणारा असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जाते आहे. पोलिसांच्या चौकशी अंती याबाबतची सर्व माहिती समोर येणार आहे. तरुण दुपारी 3 वाजता फलाट क्रमांक 1 वर मद्यधुंद अवस्थेत रुळांवर झोपी गेला होता. या तरुणाच्या कृतीमुळे आता काही काळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे त्याच्यावर रेल्वे कायदा कलम 145 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे.

    परंतू सदरील प्रकाराने काहीकाळ स्टेशनवरील वातावरण फार गंभीर बनले होते. असे प्रकार यापुढे तरी घडू नयेत यासाठी आता खबरदारी घेणं तितकचं गरजेचं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा