• Mon. Mar 9th, 2026
    सर्वस्व मानलं त्यानेच दगा दिला, लग्नाला नकार, गर्भपात करायला भाग पडलं, Chhatrapati Sambhajinagar पोलिसांनी सापळा रचत…

    छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. इथे एका 19 वर्षीय तरुणीला लग्नाचं आमिष देवून धोका देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपात करायला भाग पाडल्याचं देखील समोर आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने बळजबरीने गर्भपात करून लग्नास नकार दिला, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

    स्वप्निल सुधाकर दांडगे (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर १३ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचून स्वप्निलला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    आरोपी स्वप्निलची पीडितेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पाडून त्याने विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले, ज्यातून पीडिता गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने स्वप्निलला सांगितल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला आणि तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.

    रुग्णालयात दाखल केल्यावर फुटले बिंग

    गोळ्यांच्या सेवनानंतर पीडितेला तीव्र रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर प्रकारानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. आरोपीने गर्भपातासाठी औषधे कोठून आणली? याचा तपास करणे अद्याप बाकी आहे. तसेच या गुन्ह्यात त्याला इतर कोणी मदत केली का? याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहेत.

    सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील आहे. या घटनेतील पीडितेवर सध्या उपचार सुरु आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडितेचं आणि कुटुंबियांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा