Chhatrpati Sambhajinagar Crime News : छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. जिममधील ओळख महिलेला महागात पडली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
अमोल लक्ष्मीकांत जोगवडकर (रा.आलोकनगर सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित ३८ वर्षीय विवाहिता वाळूज महानगर परिसरात आपल्या पतीसोबत वास्तव्यास आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये जिमला जात असताना तिची ओळख अमोल जोगवडकर याच्याशी झाली होती. जिममध्ये होणाऱ्या साध्या संवादातून अमोलने तिचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि त्यांच्यात फोनवर बोलणे सुरू झाले.
Chhatrapati Sambhajinagar News : 54 दिवसांचं बाळ गेलं, माऊली 45 मिनिटं निष्प्राण लेकीकडे एकटक पाहत बसली, महाराष्ट्रातले नामवंत डॉक्टरही रडू लागले
दुचाकी खराब झाल्याचे खोटे कारण अन्…
१४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडितेचा पती घरी नसताना अमोल तिच्या घरासमोर आला. आपली दुचाकी खराब झाली आहे असा बहाणा करून त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पीडितेने त्याला घरात बोलावून पाणी दिले असता, त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. पतीला ठार मारण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले.
Chhatrapati Sambhajinagar मध्ये मंडप सजलेला, अल्पवयीन नवरीची मेकअपची तयारी अन्…, बालविवाह रोखण्याचा थरार
धमकावून वारंवार अत्याचार बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने ही बाब सुरुवातीला कोणालाही सांगितली नाही. याच हतबलतेचा फायदा घेत आरोपीने जानेवारी आणि ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा पीडितेच्या घरी जाऊन तिला धमकावत अत्याचार केला. अखेर सततच्या या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोघांनीही एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अमोल जोगवडकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
