सातारा जिल्हा परिषदेत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीमधील मित्रपक्षांतच रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेतील सत्तानाट्य आता चांगलेच रंगात आले आहे. भाजपला दूर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्यानंतर भाजप नेत्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. “आम्ही हात द्यायला नाही तर मिठी मारायला तयार आहोत. आता पालकमंत्रीच आम्हाला सोबत घेतायत का बघू”, असा मिश्किल टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला. त्यावर तोफ मागितल्यावर बंदुक तरी मिळते, अशा शब्दांत शंभूराज देसाईंनी त्यांना प्रतिटोला लगावला.
सातारा जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. भाजपला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या आहेत. पण, भाजप नेत्यांनी प्रचारात महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांवर जहरी टीका केल्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या सत्तानाट्याला वेग आला असतानाच आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी छेडले असता पालकमंत्री शंभूराजे भोसले यांच्यासमोर शिवेंद्रराजे म्हणाले की, “शंभूराज देसाई हे जिल्ह्याचे पालक आहेत. त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत. आम्ही हात द्यायला नाही तर मिठी मारायला तयार आहोत. आता त्यांना चालतंय का बघू.”
नगरपालिका निवडणुकीवेळी शंभूराजेंनी आयोजित केलेल्या बैठकीला हजर न राहिल्याने नाराजी आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रराजे म्हणाले, “शंभूराजेंनी थेट मला बोलावलं आणि मी आलो नाही, असे होत नाही. त्यांचा तो निरोप व्हाया व्हाया आला होता. त्यामुळे जरा घोटाळा झाला. भाजपच्या सदस्यांचा आकडा जरी मोठा असला तरी शंभूराज देसाई मोठे आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत एकत्र येण्याबाबत पालकमंत्रीच सांगतील. आम्ही वाट बघत बसलो आहोत. मोठ्यांनी सामावून घेतलं पाहिजे.”
“बंदूक मागितल्यावर तोफ मिळत नाही. म्हणून आधी तोफ मागितली की बंदूक तरी मिळेल”, अशी खोचक प्रतिक्रिया देत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी शिवेंद्रराजेंच्या मिश्किल टिपण्णीला प्रत्युत्तर दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत भाजपला सहभागी करून घेणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा