• Sun. Sep 20th, 2026
Satara ZP Election Winner List : त्रिशंकू निकाल, सातारा जिल्हा परिषदेचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा A टू Z

सातारा : जिल्हा परिषध आणि पंचायत समितींचा विकाल आज जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपकडून मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले हे प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री मकरंद पाटील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्री शंभुराज देसाई यांनी ताकद लावली होती. दिग्गज नेत्यांकडून या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले होते. अखेर आज निकाल समोर आला आहे. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल हा त्रिशू्ंक लागला आहे. कोणत्याही एका पक्षाला इथे स्पष्ट बहुमत मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत कोण सत्ता स्थापन करणार? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. आपण जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी जाणून घेऊयात.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 27 जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 जागांवर यश मिळालं आहे. शिवसेनेला 15 जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर इतरांना 2 जागांवर यश मिळालं आहे.

सातारा जिल्हा परिषद गटनिहाय विजयी उमेदवार

सातारा तालुका – शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), सर्जेराव सावंत (भाजप), कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), निता खरात (भाजप), राजू भोसले (भाजप), पूजा मोरे (भाजप), राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना-राष्ट्रवादी पुरस्कृत), अजित साळुंखे (भाजप).

कराड तालुका – माधवराव काळभोर (भाजप), रणजीत जाधव (भाजप), लालासो जगदाळे (भाजप), विद्या वेताळ (अपक्ष), सागर शिवदास (भाजप), धनंजय ताटे (भाजप), शैलजा शिंदे (भाजप), विजया थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रियांका साळुंखे (भाजप), मनीषा पाटील (भाजप), ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस ), सुनंदा पाटील (काँग्रेस).

पाटण तालुका – अशोक पाटील (शिवसेना), स्वप्ना पाटील (शिवसेना), राजेश पवार (भाजप), विजया कुंभार (शिवसेना), योगिता गिरी (शिवसेना), मृणाल पाटील (शिवसेना), सुनीता चाळके (शिवसेना).

कोरेगांव तालुका – अमित चव्हाण (भाजप), जयश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस), सारिका फाळके (शिवसेना), हणमंत जगदाळे (शिवसेना), राजश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस), संध्यारजनी भोसले-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस).

जावळी तालुका – वसंतराव मानकुमरे (भाजप), जयश्री गिरी (भाजप), कविता ओंबळे (शिवसेना).

वाई तालुका – दिनकर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), ऋतुजा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), वृषाली चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप बाबर (भाजप).

खंडाळा तालुका – उदय कबुले (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस), ऋषिकेश धायगुडे (भाजप).

फलटण तालुका – गिरीश बनकर (शिवसेना), रुपाली सरगर (शिवसेना), ज्योती मोरे (शिवसेना), ऋतुजा जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), वैशाली कांबळे (शिवसेना), सह्यादी कदम (शिवसेना), विष्णू लोखंडे (भाजप), किरण नलवडे (भाजप).

खटाव तालुका – लता कर्णे (राष्ट्रवादी काँग्रेस), धनंजय जाधव (भाजप), डॉ. प्रिया शिंदे (भाजप), संदीप मांडवे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनिषा फडतरे (राष्ट्रवादी काँग्रेस), तेजस्विनी कदम (भाजप), सुरज पाटील (भाजप).

माण तालुका – सोनल गोरे (भाजप), अलका जगदाळे (भाजप), सोनाली पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस), शीतल रणपिसे (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिल देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस).

महाबळेश्वर तालुका – अजित सपकाळ (शिवसेना), संजय केळगणे (राष्ट्रवादी काँग्रेस).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed