• Sun. Jun 7th, 2026
    Mahashivratri 2026: मोठी बातमी! महाशिवरात्रीला भीमाशंकराचं दर्शन दुर्लभ; ‘इतके’ दिवस मंदिर राहणार बंद, काय कारण?

    Bhimashankar jyotirling temple in pune: नाशिक येथील कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे.

    Bhimashankar jyotirling temple in pune(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले असून, पायरीमार्गाचे काम सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता महाशिवरात्रीच्या निमित्ताने येत्या १२ ते १८ फेब्रुवारीदम्यान भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने खुले ठेवणे शक्य नाही. त्यामुळे महाशिवरात्रीसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केला आहे.

    नाशिक येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सुमारे एक लाख भाविक येथे दररोज येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधांसाठी या विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.

    Maharashtra TimesBaramati Crime: रात्रीचा थरार, कोयत्याचा वार; पोलिसांचाही जोरदार पलटवार; प्रवाशांना अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा खाकीने केला करेक्ट कार्यक्रम
    आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा निर्माण करण्साठी विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठीचे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड, अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे.

    कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या पाहता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे; तसेच आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने महाशिवरात्रीचा १२ ते १८ फेब्रुवारीचा कालावधी वगळून तीन महिन्यांसाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु सध्या सुरू असलेल्या बांधकामाचा कामाचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षेच्या बाबींचा आढावा घेण्यात आला. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम सुरू आहे; तसेच दगड आणि बांधकाम साहित्य हलविणे शक्य नाही. त्यामुळे महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.

    Maharashtra TimesViral Video : खाकीचा थाट, लग्नाची वरात! चक्क पोलीस व्हॅनमधून निघालं वऱ्हाड, काय आहे नेमकं प्रकरण? व्हिडिओ प्रचंड व्हायरल
    भीमाशंकर भागात ते सप्टेंबर या महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. त्या कालावधीत बांधकाम करणे शक्य नाही. सध्या कामांचा वेग पाहता भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाशिवरात्रीसाठी मंदिर खुले ठेवणे शक्य नाही. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा