Ladki Bahin Yojana: नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. तब्बल ७१० पुरुष या योजनेचा लाभ घेत होते. कसं फुटलं बिंग?
जिल्ह्यात एकूण चार लाख २२ हजार ७५८ लाभार्थी नोंदणीकृत असताना, पात्रता व अपात्रता निकषांच्या पडताळणीनंतर ३७ हजार ११५ लाभार्थ्यांचे डिसेंबर महिन्यापासून हप्ते थकीत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाभरात ७१० पुरुषांचे अर्ज या योजनेत आढळून आले आहेत. यामुळे अर्ज प्रक्रियेतील त्रुटी व पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या योजनेत ६५ वर्षांवरील चार हजार ८३ लाभार्थी, घरातील सदस्य शासकीय नोकरीत असलेले तब्बल ३० हजार २७१ लाभार्थी, तसेच ई-केवायसी मध्ये वय २१ वर्षांखाली दर्शविण्यात आलेले दोन हजार ५१ लाभार्थी आढळून आले आहेत. या सर्व गटांचा एकत्रित आकडा ३७ हजार ११५ इतका असून, या लाभार्थ्यांना सध्या योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे.
buldhana Accident: सासुरवाडीवरुन घरी परतताना काळाचा घात; जावयाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
दरम्यान, केवायसी करताना तांत्रिक त्रुटी किंवा चुकून चुकीची माहिती भरली गेली असण्याची शक्यताही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या आकड्यांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सखोल पडताळणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांमुळे खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ वेळेवर मिळतो की नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असून, भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी अर्ज व पडताळणी प्रक्रियेत अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Yavatmal News: पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य? यवतमाळच्या शाळेतील घटनेची भाजपकडून तक्रार
केवायसी प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या समोर आलेले आकडे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. अंतिम पडताळणी झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. –संजय पाटील, प्रभारी जिल्हा व बालकल्याण अधिकारी, नंदुरबार
