Kishori Pednekar : महापौरपदाच्या लढतीत न उतरण्याची भूमिका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
“२०२२ पासून जी लढाई चालू होती, त्यात भले ८३ ते ८९ झाले, पण मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर मुंबईत जो जनादेश मिळाला, ते नाव कोणी गरजेपुरतं वापरतंय, ते लोकांना दिसतंय, त्यामुळे आमची लढाई मराठीच्या अस्मितेसाठी होती. ती कायम लढत राहू, भाजपने मराठी महापौर दिलाय, तर आम्ही अपशकुन करणार नाही.” असं सूचक वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
मनसेचे बंड, ठाकरेसेनेची कोंडी; KDMC मध्ये ‘नंबर’मुळे गेम, विधानसभेसारखा डाव टाकण्याचा महायुतीचा प्लॅन
“आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि यावेळीही ती मान्य केलेली आहेत. पण आम्ही सक्षम विरोधीपक्ष नेता म्हणून.. जसं सत्तेत असतानाही पूर्वी आम्हाला विरोधी पक्षाच्या भूमिका बजावाव्या लागल्या आहेत, तशी आताही ती भूमिका पद्धतशीर, नीटनेटकी, कुठल्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता, प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील प्रश्न मांडतील, भांडतील, मुंबईच्या भल्यासाठी जे जे आहे, ते ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” असं पेडणेकर यांनी सांगितलं.
Ajit Pawar : अजित दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी काय झालं? जवळच्या व्यक्तीची 4 तास CID चौकशी, महत्त्वाचे धागेदोरे हाती
उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा उमेदवार
दरम्यान, मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मुंबईचे उपमहापौर पद सव्वा वर्षाकरिता असेल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
Mumbai News | CSMT – Goregaon local train ३ महिने बंद राहणार, लाखो प्रवासी चिंतेत
