• Fri. Jun 19th, 2026

    Solapur News: ईव्हीएम मशीनवर जादूटोणा? ईव्हीएम खाली आढळले टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची; सोलापुरातील घटनेने खळबळ

    Solapur News: ईव्हीएम मशीनवर जादूटोणा? ईव्हीएम खाली आढळले टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची; सोलापुरातील घटनेने खळबळ

    ईव्हीएम मशीनखाली टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची आढळली. जादूटोण्याच्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये भीती पसरली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: सोलापुरातील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समितीच्या निवडणूका शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनखाली चक्क टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची ठेवून जादूटोणा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. याबाबत अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएम मशीन खाली चक्क लिंबूला टाचण्या टोचून बिबा ठेवल्याने मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    धक्कादायक प्रकार समोर आला

    सोलापूर शहराला चिटकूनच दक्षिण सोलापूर तालुका आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे दक्षिण सोलापूर मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. एक महिला मतदार मतदान करण्यासाठी केंद्रात गेली. मतदान करून बाहेर येत असतानाच त्या महिलेला अचानक चक्कर आली आणि ती जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेने ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू-मिरची आणि जादूटोण्याचे साहित्य पाहिल्याचे सांगितले.

    अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी हा प्रकार समोर आणला

    शुद्धीवर आलेल्या महिलेच एकूण खातरजमा करण्यासाठी पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष लढणारे उमेदवार संदीप राठोड या तातडीने मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यांना ईव्हीएम मशीनच्या खालील बाजूस टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची आढळून आली. हे पाहून उमेदवार आणि तेथील प्रतिनिधींना मोठा धक्का बसला.

    Maharashtra TimesMumbai Local : मुंबई लोकलमध्ये पुरुष बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात घुसला? धक्कादायक दावा करणारा व्हिडीओ

    निवडणूक आयोग काही कारवाई करणार का?

    मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर जादूटोण्याच्या सारखा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यात जे अधिकारी आणि उमेदवार सामील आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संदीप राठोड यांनी केली आहे.

    “लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशा प्रकारे जादूटोणा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा प्रकार निंदनीय आहे,” असेही राठोड यांनी यावेळी म्हटलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा