• Thu. Jun 25th, 2026

    चिंचखेरी परिसरात युवा क्रिकेटपटू मैदानावरच कोसळला, निष्ठूर नियतीने डाव साधला, क्रिकेटपटू जागेवरच…

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    चिंचखेरी परिसरात युवा क्रिकेटपटू मैदानावरच कोसळला, निष्ठूर नियतीने डाव साधला, क्रिकेटपटू जागेवरच…
    रत्नागिरी
    अलीकडे कोणत्या वयात काय होईल याचा नेम नाही अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी शहराजवळ घडली आहे. मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या एका उत्तम क्रीडापटूचा मैदानातच कोसळल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रविण बबन पवार असे या क्रीडापटूचे नाव आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या चिंचखरी परिसरात क्रिकेटच्या मॅचेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. क्रिकेट खेळता खेळताच प्रविण बबन पवार हा हृदयविकाराच्या झटक्याने जमिनीवर कोसळला.

    रुग्णालयात नेले पण…

    त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे तो मृत असल्याचे घोषित करण्यात आले. रत्नागिरी शहरातील क्रिडा क्षेत्रात नावाजलेलं नाव तसंच तरूण उद्योजक म्हणून प्रविण पवार अशी त्याची ओळख होती. त्याच्या मृत्यूने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. युवा स्पोर्टसचे मालक तथा रत्नागिरी टेनिस क्रिकेट क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व प्रविण पवार यांचे शुक्रवारी दुःखद निधन झाले. चिंचखरी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. मैदानावरच ते कोसळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

    क्रिकेट विश्वावर शोककळा

    प्रविण पवार यांच्या अकाली निधनाने रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे ते खेळाडू,संघटक आणि क्रीडाप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाली असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

    दिवंगत आत्म्यास शांती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडाप्रेमींनी अर्पण केली आहे. या घटनेने रत्नागिरी शहर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

    दरम्यान, सध्या हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे. अनेक कलाकारांचाही यापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed