• Sat. Mar 7th, 2026

    आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना

    मुंबई

      आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे आता स्वत:ला वेगळ्या पातळीवर नेण्याची संधी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना आज शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे. तब्बल 28 वर्षाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या इंग्लंडला पाणी पाजून पुन्हा एकदा वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. टीम इंडियाच्या कामगिरीवर तर सर्वांचं असेल. परंतू तीन खेळाडूंना आपल्या नावानुसार चमकदार कामगिरी करावी लागेल. कॅप्टन आयुष म्हात्रे याला मिडल ओव्हरमध्ये हात साफ करावे लागतील तर ओपनर अॅरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशीला आक्रमक ओपनिंग करावी लागणार आहे.

    भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 फायनलसाठी दोन्ही संघाचे स्कॉड

    टीम इंडिया : ऑरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकिपर), आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, हरवंश पंगालिया, मोहम्मद सिंग अनन, मोहम्मद किशन कुमार, उदंड

    इंग्लंड : बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्ह (विकेटकिपर/कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अ‍ॅलेक्स फ्रेंच, अ‍ॅलेक्स ग्रीन, आयझॅक मोहम्मद, ल्यूक हँड्स, विल बेनिसन.

    अंडर 19 चा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?

    अंडर 19 ची वर्ल्ड कप फायनल दुपारी 1 वाजता खेळला जाईल, तर टॉस दुपारी 12:30 वाजता होईल. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. तुम्ही जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed