केतन अग्रवाल मृ्त्यू प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. केतनच्या होणाऱ्या बायकोनेच प्रियकराच्या मदतीने त्याला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. होणाऱ्या बायकोनेच केतन अग्रवाल नावाच्या व्यावसायिक तरुणाची हत्या केली. खरंतर घटना घडली तेव्हा संबंधित घटना ही एक अपघात असल्याचं बोललं जात होतं. केतनचा लोहगडाच्या कड्यावरुन तोल गेल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी बातमी समोर आली होती. पण पोलिसांनी या प्रकरणी तपास केला तेव्हा हे एक गंभीर प्रकरण असल्याचं पोलिसांच्या लक्षात येऊ लागलं. हे प्रकरण बाहेरुन जसं वाटत आहे, तसं नाही. हे प्रकरण केवळ अपघाताचं प्रकरण नाही, असं पोलिसांच्या निदर्शनास आलं.
पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. यामुळे पोलीसही चक्रावून गेले. एक 20 वर्षाची तरुणी आपलं लग्न ठरलेल्या तरुणासोबत इतकं निर्घृणपणे वागू कशी शकते? असा प्रश्न पोलिसांना सतावू लागला. हे पचवणं कठीण होतं पण पोलिसांनी सत्याला प्रमाण मानलं आणि तपास पुढे नेला. पोलिसांनी सिया गोयल या 20 वर्षीय तरुणीची कसून चौकशी केली आणि हळूहळू प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
केतन आणि सियाचं अरेंज मरेज ठरलं
या घटनेतील मृतक तरुण केतन अग्रवाल हा खूप श्रीमंत घरातील होता. त्याचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक आहेत. तर 24 वर्षीय केतन अग्रवाल याने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी घेतली होती. त्याने त्यासाठी विदेशातून नामांकीत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. केतनचं सियासोबत लव्ह मॅरेज होणार नव्हतं तर अरेंज मॅरेज होणार होतं. त्याच्या कुटुंबियांनी इतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने सियासोबत लग्न ठरवलं होतं.
सियाने केतनला फसवलं
कुटुंबियांची इच्छा असल्याने केतनने देखील सियासोबत अरेंज मॅरेज करण्यास होकार दिला होता. तो तिच्यावर प्रेम करु लागला होता. तसेच सिया म्हणेल ते प्रमाण असं मानत तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता. पण सिया गोयल ही तरुणी केतनला फसवत होती. तिचे केतनवर प्रेम नव्हते. याउलट तिचे चेतन चौधरी नावाच्या तरुणावर प्रेम होते. पण कुटुंबियांनी केतन अग्रवाल याच्यासोबत लग्न ठरवल्याने तिने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवलं.
सिया आणि चेतन यांचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरु झालं?
पोलिसांनी या प्रकरणात तपास केला असता सविस्तर माहिती समोर येऊ लागली आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण समजून घ्यायचं असेल तर आधी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील लव्ह स्टोरी समजून घ्यावी लागेल. कारण त्यांच्या प्रेम प्रकरणामुळेच निष्पाप केतनचा बळी घेतला गेला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचं प्रेम प्रकरण फार जुनं आहे, असंही नाही. दोघांची पहिली भेट गेल्यावर्षी दिवाळीच्या पार्टीत झाली होती.
सिया-चेकन यांचे एकमेकांना 2000 कॉल
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. सिया आणि चेतन यांची दिवाळी पार्टीतील भेटीवेळी ओळख झाली. या भेटीत दोघांची मैत्री झाली होती. या मैत्रीतून ते एकमेकांच्या जवळ आले. ते दोघे एकमेकांना फोन कॉल करायचे, चॅटींग करायचे. दोघांनी एकमेकांना तब्बल 2000 पेक्षा जास्त कॉल केल्याचं तपासात उघड झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
कॅफेत रचला हत्येचा कट
सियाचं केतन सोबत लग्न ठरल्यानंतर सिया ही चेतन चौधरी याला भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये जायची. तिथे ते केतनला संपवण्याबाबत चर्चा करायचे. संबंधित कॅफेतील बैठकांमध्येच दोघांनी थंड डोक्याने केतनचा काटा ठरवल्याचे तपासात समोर आल्याचं वृत्त आहे.
घटनेआधी कॅफेत दोघांची भेट
घटना घडली त्याआधी सिया आणि केतन यांची एका कॅफेमध्ये भेट झाली होती. या कॅफेमध्ये त्यांनी केतन अग्रवाल याला ठार मारण्यासाठी योजना आखल्याचा आरोप पोलिसांचा आहे. दोघांनी कॅफेत चर्चा करत असताना लोहगडावरील काही संभाव्य जागा ठरवल्या जिथे केतनला ढकलून देता येईल.
तपास कर्त्यांच्या अंदाजानुसार, ३१ मे रोजी लोहगड किल्ल्याला दिलेल्या भेटीदरम्यान हा कथित कट रचला गेला असावा. त्या प्रवासादरम्यान सियाने केतनला किल्ल्याच्या कडेला बसलेले पाहिले आणि सर्वप्रथम त्याला ठार मारण्याचा विचार केला, असे पोलिसांनी सांगितले.
पहिला प्रयत्न अयशस्वी
या कथित योजनेच्या अंमलबजावणीचा पहिला प्रयत्न 14 जून रोजी करण्यात आला होता, असाही पोलिसांचा दावा आहे. तेव्हा सियाने केतनला किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने साप दिसल्याची आरडाओरड केली आणि नंतर घाबरल्यामुळे तो चुकून पडला असा दावा केला.
सिया लग्नासाठी तयार नव्हती, पोलिसांना संशय
सियाला लग्नासाठी वेळ हवा होता. कुटुंबाचा दबाव असूनही सिया लग्नासाठी तयार नव्हती, असा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे ती केतन चौधरी याच्यासोबत प्रेम संबंधात होती तरी तिला लगेच त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. ती त्यासाठी तयार नव्हती, असा पोलिसांचा दावा असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसाकडून सखोल तपास केला जात आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा