शरद पवार यांची टर्म संपल्यावर त्याच जागेवर निवडून गेल्यास ६ वर्षांची पूर्ण टर्म पार्थ पवार यांना मिळेल. त्यामुळे ते २०३२ पर्यंत राज्यसभेचे खासदार राहतील. सुनेत्रा यांच्या जागी राज्यसभेवर गेल्यास पार्थ यांना २०२८ पर्यंतच खासदार राहता येईल. त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. राज्यसभेची पूर्ण टर्म मिळावी यासाठी पार्थ पवार प्रयत्नशील आहेत.
एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांची राज्यसभेची टर्म संपेल. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शपचे शरद पवार, फौजिया खान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे धैर्यशील पाटील, भागवत कराड, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना उबाठाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
एप्रिल २०२६ मध्ये सात जागांसाठी निवडणूक लागेल. त्यावेळी एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३७ मतांचा कोटा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४० आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे पार्थ पवार अगदी सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ १० आमदारांचं बळ असल्यानं त्यांना एकाही उमेदवाराला विजयी करता येणार नाही.