Pune Municipal Election : महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्याच हाती राहाव्यात, यासाठी भाजपमधील काही प्रमुख नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू झालेत
स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. राजकीय पक्षांचे सध्याचे संख्याबळ पाहता भाजपला १२, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे. महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्याच हाती राहाव्यात, यासाठी भाजपमधील काही प्रमुख नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, अनिल उर्फ बॉबी टिंगरे, उमेश गायकवाड, हरिदास चरवड, मारुती तुपे आदींच्या नावाची स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.
पुणे महापालिकेचे १६५ नगरसेवक हे ११ विधानसभा मतदारसंघांत पसरले आहेत. त्यातील सर्वाधिक नगरसेवक हे आठ मतदारसंघात आहेत. पुरंदर, भोर-वेल्हे-मुळशी आणि शिरूर मतदारसंघातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या काही गावांत नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने सभागृह नेतेपदी निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांची नियुक्ती केली आहे. मंजूषा नागपुरे यांना महापौरपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमहापौरपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) देण्यात आले असून, परशुराम वाडेकर यांना ती संधी देण्यात आली आहे. बीडकर यांचा प्रभाग कसबा-कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात येतो. नागपुरे यांचाही प्रभाग पर्वती-खडकवासला विधानसभा मतदारसंघात पसरलेला आहे. वाडेकर हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आहेत.
Sharad Pawar : अलिकडे घडलेल्या अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे मी यावेळी… शरद पवारांनी 58 वर्षांचा शिरस्ता चुकवला, नेमकं काय झालं?
वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांत सत्तेचा वाटा मिळाला नसून, स्थायी समितीचे अध्यक्षपद या मतदारसंघांमध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघालगतच्या समाविष्ट गावांमध्येही अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. स्थायी समितीशिवाय शहर सुधारणा समिती, महिला बालकल्याण समिती, शिक्षण विभाग, ‘पीएमपीएमएल’वर संचालकपदी नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार असला, तरी स्थायी समितीवर आपली वर्णी लावण्यासाठी सर्वच ज्येष्ठ नगरसेवकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र दिसू लागले आहे.
Ajit Pawar : अजितदादांची आठवण उडत-उडत पायाजवळ आली… ‘तो’ कागद दाखवणारा बारामतीतला व्हिडिओ, विमान अपघातानंतर…
भाजपने गेल्या पंचवार्षिकमध्ये केवळ दोघांनाच महापौरपदी संधी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात हीच संधी चार नगरसेवकांना देण्यात आली होती. यंदाच्या सत्तेच्या काळात अधिकाधिक नगरसेवकांना महापौर; तसेच इतर स्थांनावर संधी मिळाली, तर त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो, असा मतप्रवाह भाजपमध्ये सुरू झाला आहे. महापौरपदाची संधी हुकल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. स्थायी समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीनंतर त्यात वाढ होणार आहे.
अजितदादांचं पुण्यावर प्रचंड प्रेम, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठं योगदान; मुरलीधर मोहोळ यांना अश्रू अनावर
