• Wed. Jun 17th, 2026

    Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडा

    Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडा

    Pimpri Chinchwad Chakan Boy Friend Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील चाकणमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    चाकण बॉयफ्रेंडची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    त्रासाला कंटाळून हत्या

    मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40, विवाहित) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला बेदम मारहाण करत होता आणि मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाण हिने पुण्यात कामानिमित्त आलेल्या आपला मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21) याच्याकडे आपली व्यथा मांडली. ती स्वतः चाकण येथे मुलाकडे आली. प्रियकराकडून होणाऱ्या मारहाणीची माहिती दिल्यानंतर उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेण्यात आले.
    Maharashtra TimesAjit Pawar: दिवंगत अजित पवार यांच्याशी संबंधित विषयावर बारामतीत माध्यमांशी संवाद साधला जाणार7 जानेवारी रोजी उषा चव्हाण हिने मुंजा नरहरे याला चाकणमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. गंगाखेड येथून मुंजा चाकणला आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीवरून त्याला सोबत घेतलं. त्यानंतर खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करून बिरदवाडी येथील ओढ्याजवळील निर्मनुष्य ठिकाणी दारू पार्टी करण्यात आली. दारू पित असतानाच निखिल आणि स्वप्नील यांनी मुंजा नरहरेवर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला.

    दारुच्या बाटल्या अन्…

    ही घटना घडल्यानंतर 11 जानेवारी रोजी त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला; मात्र आरोपींनी मृताची ओळखपत्रे आणि मोबाईल काढून घेतल्याने सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता. तरीही पोलिसांनी हार न मानता सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील कंपन्यांमधील कामगारांकडे कसून चौकशी सुरू ठेवली. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे पोलिसांनी खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानांमध्ये चौकशी केली.
    Maharashtra TimesTrimbakeshwar Nagar Parishad: ‘स्वीकृत’साठी तब्बल सव्वा कोटीची बोली! त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत पैशांचा खेळ, सामंजस्याने कमाई?

    7 जानेवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास तिघेजण दारूच्या बाटल्या खरेदीसाठी आल्याचे स्पष्ट होताच तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निखिलच्या मित्राची असल्याचेही निष्पन्न झाले. या संपूर्ण हत्येचा कट उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी रचल्याचे स्पष्ट झाले असून, उत्तर चाकण पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा