Ajit Pawar News: बारामती येथे विमान अपघात होण्याच्या सहा मिनिटे आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संवाद साधला होता. या संवादाचे रेकॉर्डिंग आज पत्रकार परिषदेत ऐकवण्यात आलं आहे.
श्रीजीत पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण माळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे, अशी मागणी करणारा टेक्स्ट मेसेज अजित पवार यांना केला होता. हा मेसेज प्राप्त झाल्यानंतर विमान प्रवासात असलेल्या अजित पवारांनी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी श्रीजीत पवारांना फोन करून आपण सर्व जाती-धर्माच्या लोकांना निवडणुकीत कशी संधी दिली आहे, याबाबतची माहिती दिली.
श्रीजीत पवारांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कॉल रेकॉर्डमध्ये नेमका काय संवाद?
अजित पवार- आम्ही पण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जातो.
श्रीजीत पवार- मला जे वाटलं ते मत मी मांडलं दादा.
अजित पवार- अहो, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी सुपे गटातून दिली आहे. ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखी होती. असं असतानाही इतर पक्षांनी वेगळे उमेदवार दिले. मात्र त्या पद्धतीने आपण केलं आहे.
श्रीजीत पवार- ठीक आहे दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो, तो निर्णय घ्या.
अजित पवार- ओके.
दरम्यान, “शेवटच्या क्षणापर्यंत सर्व जातीतील समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याची दादांची भूमिका अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जपली, हे या संवादातून स्पष्ट होतं,” असं श्रीजीत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
