• Fri. Aug 14th, 2026

    नगरपालिकेचे बनावट शिक्के,अधिकाऱ्यांची खोटी सही; सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2026
    नगरपालिकेचे बनावट शिक्के,अधिकाऱ्यांची खोटी सही; सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा

    नंदुरबार-प्रतिनिधी 

    सध्या देशात गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले आहे. डिजिटल युगात गुन्हेगारांनीही त्यांची डोकी चालवून कमाई करण्याचे कामे सुरु केलेली आहेत. असाच काहीसा प्रकार आता नंदुरबारमध्ये समोर आला आहे. नंदुरबार शहरात गेल्या सात वर्षापासून एका सायबर कॅफेमध्ये बनावट शिक्यांच्या बनवून बोगस मृत्यू प्रमाणपत्राच बनवण्यात येत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

    नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेल्या आ. के.ऑनलाइन सायबर कॅफेत हा प्रकार घडला. अनिल यशवंत कोळी ( रा. अमळथे, ता. नंदुरबार) व रिजवान सुभान खान ( रा. मुजावर मोहल्ला, नंदुरबार यांनी संगनमत करून गेल्या सात वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट जन्म नोंदी तयार केल्या. यासाठी त्यांनी जुन्या व जीर्ण रजिस्टर तसेच गहाळ रजिस्टरमधून मधील नोंद क्रमांकांचा गैरवापर करून प्रत्यक्षात जन्म नोंद नसतानाही बनावट नोंदी तयार करीत होते.

    तयार केलेली बनावट जन्म प्रमाणपत्रे रिजवान याच्या मोबाईलवर पाठवून त्यांचा वापर इतर शासकीय दस्तऐवज काढण्यासाठी केला जात असल्याचेही समोर आले आहे.

    तसेच पालिकेचा व पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाचे बनावट शिक्यांच्या वापर करून बनावट जन्म मृत्यू दाखला देत होते. या प्रकारामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

    याप्रकरणी पालिकेचे कर्मचारी युवराज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अनिल यशवंत कोळी व रिजवान सुभान खान या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले हे करीत आहेत.

    याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना 9 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी पोलिसांनी पालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed