• Sun. Jun 21st, 2026

    भरधाव कार गर्दीत घुसली, अनेक जण गंभीर जखमी

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2026
    भरधाव कार गर्दीत घुसली, अनेक जण गंभीर जखमी

    सांगली

    भरधाव कारनं दुचाकी आणि पादचाऱ्यांना उडवल्याची घटना सांगलीत घडली आहे. गणपती पेठपासून टिळक चौकापर्यंत भरधाव इनोव्हा कार अनेक वाहनांना धडक देत गेली. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. इनोव्हाच्या धडकेत दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. संतप्त जमावानं कार चालकाला बेदम चोप दिला आहे. टिळक चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली असून तणावपूर्ण परिस्थिती आहे.

    इनोव्हा कारनं गणपती पेठेपासून टिळक चौकापर्यंत दुचाकींना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. ही कार धडक देत भरधाव वेगात पुढे जात होती. या कारच्या धडकेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तीन ते चार दुचाकींचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुसाट वेगात निघालेली कार टिळक चौकात थांबली. त्यानंतर संतप्त जमावानं कारच्या चालकाला बाहेर काढलं. त्याला बेदम चोप दिला. जमावानं कारची तोडफोड केली. कारच्या काचा फोडण्यात आल्या.

    सुसाट वेगातील इनोव्हा कार गर्दीच्या भागातून दुचाकी आणि पादचाऱ्यांना उडवत निघाली होती. अखेर टिळक चौकातील श्री गणेश बेकरी समोर ही कार रोखण्यात आली. यानंतर संतप्त जमावानं कारच्या चालकाला बाहेर काढून मारहाण केली. त्याच सुमारास काही तरुणांनी कारची तोडफोड सुरु केली. कारचा बोनेटकडील भाग फोडण्यात आला. आरसे आणि काचादेखील फोडण्यात आल्या. काही तरुण थेट कारच्या बोनेटवर चढले. त्यांनी कारची पुढील काच फोडली. यामुळे चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed