• Wed. Aug 12th, 2026

    Mumbai News : राज्य सरकारला मोठा झटका! नवी मुंबई महापालिकेच्या महिला अधिकारीला 25 लाखांची भरपाई देण्याचा आदेश

    नवी मुंबईत बेकायदा इमारतींवर कारवाई करताना गर्भवती असलेल्या महिला प्रभाग अधिकारीवर काही जण धावून गेले. यामुळे झालेल्या त्रासामुळे महिला अधिकारीला गर्भपात करावा लागला. या घटनेची गंभीर दखल कोर्टाने घेत राज्य सरकारला 25 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा प्रश्न तापला असतानाच, एका कारवाईच्या वेळी जमावातील काहींनी आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या एका गर्भवती महिला अधिकारीला लक्ष्य केल्यानंतर तिला बाळ गमवावे लागले. या घटनेची मुंबई हायकोर्टाने बुधवारी अत्यंत गंभीर दखल घेतली आणि त्या महिला अधिकारीला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.

    “रबाळे पोलिसांनी तिथे उपस्थित असूनही समाजकंटकांना वेळीच रोखले नाही आणि ते प्रथमदर्शनी आपले कर्तव्य करण्यात अपयशी ठरले”, असे गंभीर निरीक्षण हायकोर्टाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने याविषयीच्या सुनावणीनंतर नोंदवले.

    न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

    “या घटनेनंतर संबंधित महिला अधिकारीला वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करणे भाग पडल्याचे नवी मुंबई महापालिकेने सादर केलेल्या वैद्यकीय कागदपत्रांतून स्पष्ट होते. त्या महिला अधिकारीचे झालेले नुकसान कोणत्याही रकमेने भरून निघणार नाही. मात्र, त्या आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी वेळीच समाजकंटकांना रोखणे आवश्यक होते. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे”, असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलं

    “त्यामुळे महिला अधिकारीला झालेल्या मानसिक, शारीरिक यातना लक्षात घेऊन 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई आम्ही निश्चित करत आहोत. राज्य सरकारने दोन आठवड्यांत ही रक्कम त्यांना द्यावी. ही रक्कम राज्य सरकार घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या वेतनातून वसूल करू शकते”, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

    कोर्टाचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

    हायकोर्टातील वकील किशोर शेट्टी यांनी नवी मुंबईतील बेकायदा इमारतींच्या प्रश्नावर जनहित याचिका केल्यानंतर त्यात आदेश झाले होते. मात्र, त्याचे परिपूर्ण पालन झाले नसल्याने त्यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडकोविरोधात अवमान याचिका केली आहे. त्याची दखल घेत, “अधिकार्‍यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर कारवाई सुरू केल्याविना बेकायदा इमारतींच्या समस्येवर ठोस उपाय होणार नाही”, असे नमूद करत खंडपीठाने महापालिकेला यापूर्वीच आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

    नेमकं काय घडलं होतं?

    त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने नवी मुंबईतील चार हजारहून अधिक बेकायदा इमारतींवर पाडकामाची कारवाई तीव्र केली आहे. त्याचाच भाग म्हणून ३० जुलै रोजी पूर्णपणे बेकायदा असलेल्या इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक ऐरोलीमध्ये कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी अधिकार्‍यांना तीव्र विरोध झाला.

    वकिलांनी काय म्हटलं?

    “काही समाजकंटक अगदी अंगावर धावून आले आणि त्यामुळे अधिकारी धास्तावले. अशा परिस्थितीत कारवाई करणे अत्यंत कठीण आहे. घटनेचे चित्रिकरणही करण्यात आलेले आहे”, असे महापालिकेच्या वकिलांनी मंगळवारी निदर्शनास आणले होते. त्यानंतर खंडपीठाने ते व्हिडिओ पाहून माहिती सादर करण्यास सरकारी वकिलांना सांगितले होते. त्यानुसार बुधवारी सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडले.

    कोर्टाचा नुकसानभरपाईचा आदेश

    “घटनेच्या वेळी गोंधळ आणि खूप वादावादी झाल्याचे चित्रिकरणात दिसते, मात्र हिंसाचार झाला नाही”, असे म्हणणे सरकारी वकिलांनी मांडले. तेव्हा, “महिला अधिकारीवर जी वेळ आली त्याचे काय? पोलिसांनी वेळीच रोखले का नाही?”, असे प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केले. अखेरीस याचिकाकर्ता तसेच नवी मुंबई महापालिका व सिडको यांच्या वकिलांची मते लक्षात घेऊन खंडपीठाने नुकसानभरपाईचा हा आदेश दिला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा