Leopard alert system: अत्याधुनिक एआय आधारित प्रणालीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत नवी आशा निर्माण झाली आहे.
एआय प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली, वेळ व वावराचा परिसर याची अचूक माहिती वनविभागाला मिळणार
विशेष म्हणजे ही यंत्रणा कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय कार्यरत राहते. सौरऊर्जेवर चालणारी ही प्रणाली ग्रामीण व जंगलालगतच्या भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सायरनच्या इशाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर जाणे टाळू शकतात, जनावरे व लहान मुलांची योग्य काळजी घेणे शक्य होणार आहे. बिबट्या–मानव संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागाला तातडीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याच निधीतून हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला आहे.या एआय प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली, वेळ व वावराचा परिसर याची अचूक माहिती वनविभागाला मिळणार असून, भविष्यात संघर्ष व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.
Dhananjay Munde: ‘नियती इतकी क्रूर कशी असू शकते?’; अजित पवारांच्या पार्थिवासमोर धनंजय मुंडेंचा अखेरचा दंडवत
एआय वाईल्ड नेत्र प्रणाली
360 अंश कॅमेरा कव्हरेज, सुमारे 200 मीटरपर्यंत रेंज राहणार आहे.सायरनचा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणार. या प्रणालीत अॅडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंग या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, बिबट्यांचा स्वतंत्र डेटाबेस कॅमेऱ्यात फीड करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्याचे ओळखताच ही यंत्रणा आपोआप सक्रिय होते आणि मोठ्या आवाजातील सायरनद्वारे गावकऱ्यांना धोक्याचा इशारा या सायरांमुळे मिळणार आहे तसेच 360 अंश कॅमेरा कव्हरेज, सुमारे 200 मीटरपर्यंत रेंज राहणार आहे.
सायरनचा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणार
बिबट्या दिसल्यानंतर किमान 2 मिनिटांत सायरन सक्रिय होत असून दोन तासानंतर पुन्हा एकदा रिमाइंडर देत गावकऱ्यांना सावध करणार आहे.
