नाशिक
कोलंबियात व्यक्ती सज्ञान होताच तिचे नाव मतदारयादीत आपोआप समाविष्ट होते, तसेच मतदाराच्या मृत्यूनंतर यादीतून नाव आपोआप वगळले जाते. याच धर्तीवर भारतातही जन्म आणि मृत्यूचा दाखला निवडणूक आयोगाच्या प्रणालीला लिंक करून मतदारयादी अद्ययावतीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्र या प्रयत्नात अग्रेसर असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी रविवारी नाशिकमध्ये दिली.
मात्र, त्यांचे फोटोही सारखे असण्याची शक्यता विरळ असते. त्यामुळे दुबार नावे शोधून ती वगळतानाच यादीतील छायाचित्रांचीही एसआयआरअंतर्गत तपासणी करण्याचे काम राज्यात हाती घेण्यात आले आहे. राज्यात सुमारे १० कोटी मतदार असून, प्रत्येकाचे नाव आणि छायाचित्र तपासले जाणार आहे. यातून अर्धी मतदारयादी स्वच्छ होणार असून, पुढच्या टप्प्यात व्यक्ती १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे नाव आपोआप मतदारयादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर काम करण्यात येणार आहे.
जन्माला आलेले मूल १८ वर्षांचे झाले की त्याचे नाव मतदारयादीत आपोआप समाविष्ट होईल. यासाठी त्याला स्वत:ला काही करावे लागणार नाही. फक्त आपले नाव भारतातील कोणत्या राज्यात, कोणत्या शहरात अथवा गावातील मतदारयादीमध्ये हवे हे निवडणूक विभागाला सांगावे लागेल. आपल्याकडे जन्म-मृत्यूचा दाखला तयार होतो. तो थेट निवडणूक विभागाच्या प्रणालीला लिंक केल्यास नाव समाविष्ट करणे अथवा वगळण्याकरिता वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही. त्यामुळे यादीत दुबार नाव समाविष्ट होण्याचा प्रश्नच राहणार नाही.