• Sat. Jun 20th, 2026

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2026
    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम

    नांदेडललिता पिल्लेवार

    केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे रविवार, दि. 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

    रविवार, दि. 25 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 2 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ, नांदेड येथे सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने त्यांचे आगमन होईल. दुपारी 2.05 वाजता वाहनाने श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ नांदेड येथून प्रयाण. दुपारी 2.15 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब जी नांदेड येथे आगमन. दुपारी 2.15 ते 3.00 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब जी नांदेड येथे धार्मिक कार्यक्रमासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब जी नांदेड येथून वाहनाने प्रयाण. दुपारी 3.10 वाजता मोदी मैदान, नांदेड येथे आगमन. दुपारी 3.10 ते 4.30 वाजता श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदान नांदेड येथे उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता वाहनाने मोदी मैदान नांदेड येथून प्रयाण. दुपारी 4.40 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 4.45 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ नांदेड येथून सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed