• Mon. Sep 7th, 2026

विभागीय माहिती संचालक कार्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमित्त मराठी भाषेवर  चर्चा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jan 22, 2026
विभागीय माहिती संचालक कार्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमित्त मराठी भाषेवर  चर्चा – महासंवाद

नागपूर, दि.२२ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विभागीय माहिती संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेवर विविधांगी चर्चा झाली.

नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे यांनी मराठी व्याकरणाचे नियम, तद्भव, तत्सम शब्द आणि संस्कृतमधून मराठी भाषेत आलेले शब्द याविषयी माहिती दिली.

माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महान्यूज’ पोर्टलसाठी यशकथा लेखनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा आलेला परिचय याविषयी अनुभव कथन केले. माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी ‘कीर्तन’ या लोककला प्रकाराविषयी व या प्रकाराने मराठी भाषा समृद्ध करण्यात दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. चलतचित्रकार आशीष यावले यांनी आकाशवाणी व वृत्तपत्र माध्यमातील लिखाण व यातून मराठी भाषेच्या वैविध्यपूर्ण लिखाणा विषयीचा अनुभव कथन केले. लिपिक टंकलेखक कविता फाले यांनी स्वरचित कविता ‘सांग सखे तू स्वतःसाठी वेळ कसा काढते’ सादर केली.

डॉ. गणेश मुळे यांनी आपल्या उद्बोधनात संवादाची भाषा म्हणून मराठी भाषा टिकविण्याची आवश्यकता आणि वाक्प्रचारांमध्ये व्यक्तिरेखांचे महत्व समजावून सांगितले.मल्लिनाथी, भगीरथप्रयत्न, भीष्मप्रतिज्ञा, कळीचा नारद आदी शब्दांचा अर्थ व उत्पत्तीही त्यांनी समजावून सांगितले.

सहायक संचालक पल्लवी धारव यांनी घरातूनच मुलांना मराठी भाषा शिकविण्याची आवश्यकता पटवून दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed