काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सतेज पाटील यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. सतेज पाटील यांनी आमदारावर आरोप करणारा व्हिडीओ ट्विट केला आहे. संबंधित व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
व्हिडिओमध्ये काय दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टरने सत्ताधारी आमदाराने त्याच्याकडून 40 लाख रुपये घेतल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हा व्हिडिओ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोशल मीडियावर वेगाने पसरला असून, लोकांमध्ये उत्सुकता आणि चर्चेची ठिणगी पेटली आहे. आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर करताना सरकारला जबाबदार धरले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांची पडताळणी व्हावी, असे आवाहन केले आहे. आमदार पाटील म्हणाले, “आमदारांवर आरोप असल्यास त्याची सत्यता तपासावी, अन्यथा लोकांमध्ये अविश्वास वाढेल. मी हा व्हिडिओ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग करून पाठवला आहे. मतदानापूर्वी याबाबत खुलासा व्हावा”.
Naresh Arora यांच्या पाठिशी राष्ट्रवादी पक्ष ठामपणे उभा, अजित पवारांची भूमिका, पोलीस कार्यालयात का गेले?
कोणत्या आमदारांवर संशय?
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून निवडलेल्या तीन आमदारांवर या आरोपांचा संदर्भ असल्याचे पाटील यांनी सांगितले. सतेज पाटील म्हणाले, “हे आमदार शिंदे गटाशी संबंधित असल्याची माहिती आहे. तिन्ही आमदारांनी खुलासा करावा. भ्रष्टाचार असल्यास विरोधी पक्ष म्हणून वाचा फोडणे आमची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींवर अविश्वास वाढू नये, म्हणून ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे”. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला बोलावून खातरजमा घेण्याचेही त्यांनी सुचवले.
Pune News : ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे’, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर फडणवीसांचा मिश्किल टोला
सरकारकडून तपासाची मागणी
आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या सायबर सेलला या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. “राज्यात भ्रष्टाचाराची बाधा असल्यास त्यावर कारवाई व्हावी. मतदारांना कोणाला मत द्यायचे हे कळले पाहिजे,” असा त्यांचा निर्वाणीचा आग्रह आहे. या आरोपांमुळे महायुतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आमदार किंवा पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रचार थांबला असला तरी हा व्हिडिओ मतदानाच्या दिवशी लोकांच्या मनात घर करेल, असे चित्र पाहायला मिळत आहे.
