पुणे
१५ अधिकारी नियुक्त
या निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वांत कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून, येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत. येथे निकालाला विलंब होऊ शकतो.
दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुप्पर-इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडीमध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत; तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वात कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होणार आहे.
मतमोजणीसाठी एका 66 फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असं महापालिका निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितलं.