Eknath Shinde In Nashik: नाशकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधुंना सुनावलं आहे.
‘नेटफ्लिक्स’वाल्यांना निवडणुकीतच जाग येते
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावताना शिंदे म्हणाले की, “काही लोक दिवसभर घरात बसून नेटफ्लिक्स बघतात आणि निवडणूक आली की पावसाळ्यातील छत्र्यांसारखे बाहेर येतात. ज्यांना फक्त तिजोरीत इंटरेस्ट आहे, नाशिकमध्ये त्यांनी काम काहीच केले नाही. आम्ही स्थगिती देणारे नाही, तर विकासाला गती देणारे लोक आहोत.”
Uddhav Thackeray: भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, चुनावी हिंदुत्व अन् रावणाचा पक्षप्रवेश; उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडले
कुंभमेळ्यावरून टोला, 20 वर्षांनी येणाऱ्यांना भविष्याची चिंता
नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “काल कुंभमेळा भरला होता. 20 वर्षांनी जे आले होते, त्यांना आता 30 वर्षांनंतर काय होणार याची चिंता सतावत आहे. पण नाशिकची जनता सुज्ञ आहे. ही आजची प्रचार सभा नसून विजयाची सभा आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेवरून विरोधकांना टोला
“लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना राज्यातील महिलांनी जोडा दाखवला आहे,” अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. नाशिक हे जगाच्या नकाशावर महत्त्वाचे शहर होईल आणि आगामी कुंभमेळा हा ऐतिहासिक तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.हे प्रभू श्रीरामाचे नाशिक आहे आणि रामाचे निशाण धनुष्यबाण आहे. जो राम का नाही, तो काम का नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करा,” असे आवाहन शिंदेंनी भाषणाच्या शेवटी केले.
