Asangaon to Kasara Fourth Railway Line : कल्याण ते कसारा या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आसनगाव ते कसारा या मार्गावर चौथ्या मार्गिकेला मंजुरी मिळाली असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
दोन भागात पूर्ण होणार प्रकल्प
‘एमयूटीपी ३-अ’ मध्ये कल्याण ते कसारादरम्यान तिसरी मार्गिका उभारण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कल्याण ते आसनगाव आणि आसनगाव ते कसारा अशा दोन भागांत पूर्ण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून कल्याण ते आसनगाव तिसरी मार्गिका उभारण्यात येत आहे. नव्या मार्गिका उभारणीसाठी भूसंपादन सुरू आहे, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Ghatkopar Railway Station Update : मेट्रो आणि लोकलची तुडुंब गर्दी असलेल्या घाटकोपर स्थानकात मोठा बदल, स्टेशनवर डेक उभारणार; कुठे-कसं काम सुरू?
आसनगाव – कसारा चौथ्या मार्गिकेमुळे प्रवाशांना दिलासा
लोकल खोळंबा टाळण्यासाठी लाखो मुंबईकरांनी कल्याण ते कसारा आणि कर्जतदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याची मागणी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे केली होती. 30 डिसेंबर 2025 रोजी कल्याण ते कर्जतदरम्यान अतिरिक्त दोन मार्गिका उभारण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली होती. सध्या या मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. कल्याण ते कर्जत आणि आसनगाव ते कसारा या नव्या मार्गिकांमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल. सध्या एकाच मार्गांवरुन मेल आणि लोकल ट्रेन धावत असल्यामुळे लोकल ट्रेनला मोठा खोळंबा होतो. मात्र या नव्या मार्गिकांमुळे लोकल आणि मेल यांना स्वतंत्र्य मार्ग मिळाल्याने मोठा वेळ वाचणार आहे.
Mumbra Train accident : गर्दी कमी करण्यासाठी टास्क फोर्स, सरकारचं नवं पाऊल
पनवेल-वसई मार्गालाही लवकरच मंजुरीची अपेक्षा
‘एमयूटीपी ३ ब’ मधील बदलापूर-कर्जत आणि आसनगाव-कसारा या दोन्ही प्रकल्पांना सर्व मंजुरी मिळाली आहे. पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गालाही लवकरच अंतिम मंजुरीची अपेक्षा आहे. ‘एमयूटीपी तीन ब’ हा प्रकल्प संच निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून राज्य सरकारने घोषित केला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे, असे एमआरव्हीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
