छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झाला, ज्यातून ते सुदैवाने बचावले. या घटनेनंतर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जलील यांची भेट घेतली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली असताना शहरात एमआयएमला अध्यक्षच नाही. मतदानाला अवघे आठ दिवस राहिलेले असताना मुंबईत एमआयएम अध्यक्षाविना काम करत आहे. मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी फारुक शाब्दी यांच्याकडे होती. पण जागावाटपातून झालेल्या वादातून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते तडकाफडकी सोलापुरला निघून गेले. तेव्हापासून मुंबईत एमआयएमकडे अध्यक्ष नाही.
कसली तत्त्वं? सत्तेला महत्त्व! काँग्रेस-भाजप एकत्र, सुत्रं फिरली, युती तुटली; शिंदेसेना लाभार्थी
फारुक शाब्दी एमआयएमचे मुंबई अध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मुंबईतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शाब्दी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनीच घेतल्या. पण उमेदवार निवडीवरुन दोघांचे मतभेद झाले. त्यामुळे शाब्दी यांनी पक्षाचा आणि पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे मुंबईत एमआयएमला नेतृत्व नाही. शहरात एमआयएम ३० जागा लढत आहे.
माजी आमदार वारिस पठाण उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत. प्रदेशाध्यक्ष असलेले जलील पुढील टप्प्यात प्रचारात सहभागी होणार आहेत. पण मुंबईत अध्यक्षच नसल्यानं कार्यकर्त्यांची, उमेदवारांची मोठी गोची झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी यात लक्ष घालावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
भाजप-काँग्रेसची युती, पहिली विकेट पडली; प्रदेशाध्यक्षांनी फर्मान काढलं, मोठी कारवाई
मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एमआयएमची बऱ्यापैकी ताकद आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात एमआयएमचं वर्चस्व आहे. २०१७ मध्ये इथून एमआयएमचा उमेदवार निवडून आला होता. कुर्ल्यातील कुरेशी नगर, नेहरु नगर, कुर्ला पश्चिममध्ये पक्षाची ताकद आहे. गेल्या निवडणुकीत इथे एमआयएमचे उमेदवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी होते. मानखुर्दमध्येही पक्षाचं प्राबल्य आहे. याशिवाय भायखळा, नागपाडा, मदनपुरा, मालाडमधील मालवणीत पक्षाची ताकद आहे.
