मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. तर भाजप आणि शिंदे गटाचीदेखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दरम्यान मुंबईत कुणाची सत्ता यावी? याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“ह्यांना भूखंड पाहिजे. ह्यांना म्हाडाच्या सर्व जागा पाहिजेत. हे मोठमोठे ग्राऊंड साफ करतात. ह्यांना समुद्राचीदेखील जागा कमी पडते. आता ते आदिवासींचं एक बेट आहे. ते बेटसुद्धा ह्यांना पुरत नाही. त्यांनी पलिकडे गुलाल टाकून उद्घाटनदेखील केलं. ह्यांना त्यांचे उद्योगधंदे चालले पाहिजेत. त्यासाठी ह्यांचे प्रयत्न असतात. आम्हाला काहीच फरक पडणार नाही. गोरगरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल बोणार आहेत का? याचं उत्तर नाही असं आहे. त्यांच्यातील लोकं सुधारणार आहेत. पण त्यावेळेस आपण म्हणालोच होतो. त्यात बदलायचं कारण नाही. मी बदलतो कुठे? लोकांची ती म्हणच आहे की, मुंबईत ठाकरे पाहिजेत. आमची कुठे म्हण आहे?”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
BMC All Candidate List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागात कोणाकोणात लढत? वाचा A टू Z यादी
सी. आर. पाटील यांच्या वक्तव्यावर जरांगे संतापले
दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील संतापले आहेत. “केंद्र सरकारमधील एखाद्या मंत्र्याने बेजबाबदार वक्तव्य करु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याया विरोधात लढाया उभारल्या. एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या जातीबद्दल बोलणं आवश्यत नाही. पण या भाजपच्या काही लोकांना मतासाठी आणि सत्तेसाठी अशी सवय लागली आहे की, ते कोणत्याही विषयाला काहीही जोडतात. राजकीय लाभापोटी विनाकारण जात जोडली जाते”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Sangli News : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, सांगलीत मोठी खळबळ
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगणं आहे की, महापुरुषांना तुमच्या फायद्यासाठी असं बोलू नका. त्यांना ते वक्तव्य मागे घ्यायला लावा. राज्यापासून देशापर्यंत निषेध सुरु झाला तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील त्या मंत्र्यांना फोन करुन सांगावं की, छत्रपती शिवराय हे सर्व जाती-धर्मासाठी लढले आहेत. भाजपच्या लोकांना मोठेपण तर नाहीच आहे, पण जातीत तोलून संकुचित जी वृत्ती ती बंद करा. त्याला त्याचं स्टेटमेंट मागे घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. अन्यथा भाजप विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होईल”, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
